मनसेचा झेंडा बदलणार ! |झुंजार झेप न्यूज

0 झुंजार झेप न्युज

मुंबई प्रतिनिधी :
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर.

मनसे पक्षाचा झेंडा बदलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी झेंड्याचा रंग भगवा किंवा केशरी करणार असल्याची राजकीय चर्चा आहे. झेंड्याचा रंग बदलवण्यावर विचारविनिमय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या निळा, भगवा आणि हिरवा असलेला मनसेचा झेंड्याचा रंग बदलून आता संपूर्ण झेंडा भगवा करण्यात येणार आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत. त्यासाठी झेंड्याचा रंग बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे आता हिंदुत्वाची वोट बँक तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्वाबाबात मवाळ भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे.

ती निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसे आता नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा असून राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.