आयसीसीकडून होणार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सन्मान!

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली, 15 जानेवारी : आयसीसीने बुधवारी पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये भारताचा फलंदाज रोहित शर्माने बाजी मारली असून विराट कोहली आणि दीपक चाहरलासुद्धा पुरस्कार मिळाला आहे. रोहित शर्माला 2019 मधील कामगिरीसाठी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 9 सामन्यात 5 शतकांसह 648 धावा केल्या होत्या. त्याशिवाय वर्षभरात त्याने 28 सामन्यात 1490 धावा केल्या आहेत.
5️⃣ centuries
7️⃣ ODI centuries in 2019

Your 2019 ODI Cricketer of the Year is Rohit Sharma.
1,758 people are talking about this
भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या खिलाडुवृत्तीसाठी गौरवण्यात आलं आहे. त्याला स्पिरीट ऑफ द इयर अॅवॉर्ड देण्यात आला आहे. वर्ल्ड कपवेळी स्मिथला प्रेक्षकांनी चेंडू छेडछाड प्रकरणावरून चिडवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोहलीने प्रेक्षकांना स्मिथला चिडवण्याऐवजी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा असं सांगितलं होतं.
Who remembers this gesture from Virat Kohli during ?

The Indian captain is the winner of the 2019 Spirit of Cricket Award 🙌
1,217 people are talking about this
रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला टी20 चा परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. चाहरने बांगलादेशविरुद्ध नागपूर टी20 सामन्यात फक्त 6 धावा देत हॅटट्रिकसह 7 गडी बाद केले होते. भारताकडून टी20 मध्ये हॅटट्रीक करणारा पहिला गोलंदाज आहे.
Deepak Chahar's 6/7 against Bangladesh in November are the best figures in the history of men's T20I cricket.

That spell is the T20I Performance of the Year.
350 people are talking about this

The XI making up the Test Team of the Year मध्ये भारताच्या दोघांची वर्णी लागली आहे. यात मयंक अग्रवाल आणि विराट कोहलीचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.