अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन- रितेश देशमुख

0 झुंजार झेप न्युज


प्रतिनिधी :
मुंबई : मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला केली आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच 'इस्टर्न फ्री वे'च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन 'इस्टर्न फ्री वे'ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
यासंदर्भात विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवारांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत.मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे' वडिलांचं नाव देण्यात येणार असल्यामुळे रितेश देशमुख भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याने आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. 'श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल - मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा,' असं रितेश देशमुख याने ट्विट केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.