शरद पवारच 'जाणता राजा', मुंबईत राष्ट्रवादीचे पोस्टर

0 झुंजार झेप न्युज

प्रतिनिधी :
मुंबई : छत्रपती उदयनराजेंनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवारच 'जाणता राजा', अशा आशयाचे पोस्टरबाजी आज राष्ट्रवादीकडून घाटकोपरमध्ये करण्यात आली आहे.
शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. 'जाणता राजा' म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त शिवाजी महाराज आहे, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते.
शरद पवारांना राजकारणातले 'जाणता राजा' असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून म्हटलं जाते. त्यांचे अनेक कार्यकर्ते पोस्टरवरही जाणता राजा लिहितात. या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असं उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पवारांचे पोस्टर झळकल्यामुळे उदयनराजे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.