Corona Virus : महाराष्ट्रात एकही संशयित रुग्ण नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | चीनमध्ये कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. यासाठी चीन सरकारचे युद्ध पातळीवर सुरू आहेत. यावर चीनसह जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. यावर आपल्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रूग्ण नसल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यात शासनाने राज्यशासनाच्यावतीने याबाबत खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये एकूण 1739 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 6 जण महाराष्ट्रातील होते. त्यात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळून आलेला नसल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चीन सरकारने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी फक्त 10 दिवसात 1000 बेड बसतील इतकं मोठं रूग्णालय बांधलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.