प्रतिनिधी :
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनी गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याचे एका ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. डीएसके गुंतवणुकदाराने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना आहे. तानाजी गणपत कोरके (वय ६१, रा. भीमनगर, आंबेडकर हायस्कुलसमोर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
दरम्यान, गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या डीएसके प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी केलेल्या समझोत्यासंबंधातील अर्जानुसार न्यायालय डीएसके आणि पत्नी हेमंती यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे.

