शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या बँकांविरोधात सरकार घेईल गंभीर निर्णय | झुंजार झेप न्यूज

0 झुंजार झेप न्युज

पुणे प्रतिनिधी :
पुणे - सुरक्षा रक्षकांनी मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना रोखले होते. त्यांनी बँकेने आपल्याला विनाकारण त्रास दिल्याची तक्रार केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेतकरी खातेदाराला बँकेने त्रास दिल्यास, त्यांच्याविरोधात सरकार गंभीर निर्णय घेईल, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. भूमिगत मेट्रोच्या कामासाठी नव्याने आलेल्या टीबीएम टनेल बोरिंग मशीनची एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभही त्यांच्याच हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, एका महिन्याच्या आत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या दोन लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी दोन दिवसांपूर्वीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत संबंधित बँका, अधिकारी यांना कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.