माणगावजवळ एसटी बस पुलावरून कोसळून भीषण अपघात; २० जण जखमी, दोघे गंभीर

0 झुंजार झेप न्युज

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक कळमजे पुलावरून एसटी बस कोसळून अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात 2 गंभीर तर 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे. एसटी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. बसमधून 44 प्रवासी प्रवास करत होते.
मुंबई आगारातून रातराणी (एमएच 14/ बीटी 0143) एसटी बस दापोलीकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. एसटी बस ही पहाटे पाच ते साडेपाच दरम्यान माणगाव नजीक असलेल्या कळमजे पुलावर आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. अपघातांनातर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सुदैवाने एसटी बस ही नदी पत्रात पडली नाही. अन्यथा बसमधील काही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले असते. काही दिवसांपासून एसटी बसमधील अपघाताच्या प्रमाणात मात्र वाढ होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.