Me Too : अनु मलिक यांच्याविरोधात पुरावेच नाहीत; महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय!

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली: बॉलीवूड आणि राजकारणात MeToo चे वादळ आले होते. त्यात महिलांनी त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडला. mETOOच्या वादळात संगीतकार अनु मलिकही अडकले होते. मात्र त्यांना महिला आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कुठलेही सबळ पुरावे न मिळाल्याने महिला आयोगाने अनु मलिक यांच्या विरोधातील फाईल तूर्तास बंद केली आहे.
अनु मलिकविरोधात महिला आयोगाला कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. अर्थात आरोप करणा-या महिलांनी ठोस पुरावे सादर केल्यास ही केस पुन्हा उघडली जाऊ शकते.
अनु मलिक गत दोन वर्षांपासून लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलत आहेत. 2018 मध्ये मीटू मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले गेले होते. सिंगर सोना मोहपात्रा हिने सर्वप्रथम अनु मलिक यांच्यावर आरोप केला होता. गायिका नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांनी सोनाला पाठिंबा देत अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप ठेवले होते. त्यावेळी अनु मलिक 'इंडियन आयडल 10'चे जज होते. या आरोपानंतर त्यांना या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अर्थात प्रकरण काहीसे शांत झाल्यानंतर अनु मलिक पुन्हा 'इंडियन आयडल 11'मध्ये जज म्हणून परतले. यानंतर सोना मोहपात्राने पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. तिने दबाव इतका वाढला की, अनु मलिकला यावेळी शोमधून बाहेर पडावे लागले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.