पाकिस्तानी-बांग्लादेशी भारतात येऊ शकतात, मग मी बेळगावात जाऊ शकत नाही का? संजय राऊत बेळगावला रवाना!

0 झुंजार झेप न्युज

 कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून रोखल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. मी बेळगावला जाणारच आहे. मला कायद्याने रोखा, असं आव्हानच संजय राऊत यांनी पोलिसांना दिलं आहे.  तसेच संजय राऊत यांच्या बेळगावमधील प्रकट मुलाखतीला बेळगाव पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा बेळगावमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ‘मी भारताचा नागरिक आहे, बेळगावात जाणार आणि तेथील लोकांशी बोलणार,’ असा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे.  संजय राऊत बेळगावला रवाना झाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भाष्य केलं. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानमधील सावरकरांच्या कोठडीत फक्त दोन दिवस ठेवावं, त्यांना सावरकरांचा त्याग कळेल,’ असे राऊत म्हणाले.  दरम्यान, संजय राऊत आज सायंकाळी 4 वाजता बेळगावात पोहचतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता संजय राऊत यांची गोगटे रंग मंदिर येथे प्रकट मुलाखत होणार आहे. बेळगावमध्ये संजय राऊत बेळगाव सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचं उदघाटन करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.