पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा

0 झुंजार झेप न्युज
           
राष्ट्रीय मतदारदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी शपथ दिली.
         दि. २५ जानेवारी, २०२० रोजी “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात येणार येतो. तथापि दि.
२५ जानेवारी रोजी दुसऱ्या शनिवार असल्याने कार्यालयास सुट्टी असल्याने शासन निर्देशानुसार आज राष्ट्रीय
मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने १८ वर्षे पूर्ण केलेल्या नविन तरूण मतदारांचा यादीत
समावेश करणे व त्यांचा मतदान प्रकियेत सहभाग वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या
अनुषंगाने सर्व शाळा व शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारूप मतदान, चित्रकला स्पर्धा, क्वीझ
कॉम्पीटिशन इ. स्पर्धा आयोजित करून लोकशाही व मतदाराचा सहभाग यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार
आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.