मुंबई, 25 जानेवारी : 'मनसेप्रमुखांना त्यांचे मुद्दे मांडण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका व त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे व हे त्यांचे खेळ जुनेच आहेत,' असं म्हणत शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आता मनसे नेते आणि संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.
'आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू,' अशी विखारी टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केली आहे. त्यामुळे आगामी काळातही शिवसेना आणि मनसे आमने-सामने येणार असल्याचं दिसत आहे.
आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. नेमकं त्याच गोष्टीवर राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात. काळजी करू नका आम्हीच उपचार करू.
190 people are talking about this
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठीच्या मुद्द्यानंतर आता हिंदुत्त्वाकडे मोर्चा वळवला आहे. नुकत्याच झालेल्या महाअधिवेशानात राज ठाकरे यांनी नव्या झेंड्याचं अनावरण केलं. तसंच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो, अशी भाषणाची सुरुवात करत आपली पुढील राजकीय दिशा हिंदुत्त्वाच्या मार्गाने जाणार असल्याचे संकेत दिले.
मनसेनंही हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतल्यानंतर आधीपासूनच या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेसोबत त्यांचा संघर्ष होणार, हे स्पष्टच होतं. त्यातच आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातून मनसेवर जहरी टीका करण्यात आली आहे.


