संजय राऊतांच्या निषेधार्ध उद्या सांगली 'बंद'ची हाक, पदावरून हटवण्याची मागणी

0 झुंजार झेप न्युज

सांगली | उदयनराजे भोसले जर शिवरायांचे वंशज असतील तर त्यांनी पुरावे द्यावे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात उदयनराजे समर्थकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी कालपासून जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगली बंदची हाक दिली आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ह श्री शिवप्रतिष्ठानने उद्या सांगली बंदचं आवाहन केलं आहे. छत्रपतींच्या वंशजांबद्दल राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बंदची हाक दिली असल्याचं भिडे यांनी सांगितलं आहे.
शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकत्र जमून सांगली शहरात राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करणार आहेत. तर संपूर्ण सांगली जिह्यात कडकडीत बंद पाळण्याचं आवाहन देखील भिडेंनी केलं आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. उद्या सायंकाळी ते इस्लामपुरात एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधला 'सामना' चांगलाच रंगला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवरायांच्या वंशजांनी बोललं पाहिजे, ते शांत का?, असा सवाल विचारला होता. त्यावर उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेत राऊतांवर तोफ डोगली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.