कै. अंकुशराव लांडगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी भोसरीत निवृत्ती महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन

0 झुंजार झेप न्युज

मोशीतील रक्तदान शिबीरात प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट आणि पाच लाखांचा अपघात विमा मोफत मिळणार

पिंपरी चिंचवड,दि.06: भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या १८ व्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी (७ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 

भोसरी, इंद्रायणीनगर, सेक्टर क्रमांक १, अंकुशनगर येथील वैष्णोमाता प्राथमिक शाळेशेजारील मैदानावर गुरुवारी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या वेळेत हे कीर्तन महोत्सव होणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरूवारी सायंकाळी साडेपाच ते साडे सात या वेळेत खास महिलांसाठी ज्योती गोराणे यांचा जागर स्त्रीशक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा हा कार्यक्रम होणार आहे. 

त्याचप्रमाणे आरंभ प्रतिष्ठाण मोशी आणि कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान भोसरीच्या वतीने मोशी, गंधर्वनगरी फेज २ येथे गुरूवारी सकाळी ९ ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मोरया ब्लड बँकच्या सौजन्याने होणाऱ्या या शिबीरात सहभागी प्रत्येक रक्तदात्याला एक हेल्मेट आणि पाच लाखांचा अपघाती विमा मोफत देण्यात येणार आहे.

दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत माहिती देताना माजी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे आणि युवा नेते राहुल लांडगे म्हणाले, "कै. अंकुशराव लांडगे हे केवळ आमच्या लांडगे परिवाराचेच नाही तर भोसरीतील असंख्य परिवारांचे कुटुंबप्रमुख होते. त्यांनी राजकारणाचा वापर नेहमी लोकांच्या कल्याणासाठी केला. जात, धर्म, प्रांत, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने सर्वांना मदत करणारे पिंपरी-चिंचवडमधील ते नेते होते. त्यांचे नाव घेताच आजही अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रू येतात. ही त्यांनी लोकांसाठी केलेल्या कामाची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. ते हयात नसताना सुद्धा लोक आमच्या लांडगे कुटुंबावर तितकेच प्रेम करतात. ही सर्व त्यांची देण आहे. ते आमच्या लांडगे कुटुंबासह हजारो नागरिकांचे प्रेरणास्थान, स्वाभिमान आणि अभिमान आहेत. त्यांच्या १८ व्या स्मृतीदिनानिमित्त भोसरीमध्ये हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यासह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले." 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.