एकनाथ पवार यांना भारतीय जनता पार्टी घ्यावे अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली.
पिंपरी चिंचवड,दि.21: एकनाथ पवार यांनी महाराष्ट्र राज्य संघटक ठाकरे गट या पदाचा राजीनामा दिलेला असून. ते पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या ठिकाणी पक्षनेते कार्यरत होते. आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात सन 2014 भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी एकनाथ पवार यांना मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले होते. परंतु त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला. महेश लांडगे अपक्ष निवडून आले होते.
त्यानंतर भोसरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी नाराज व्यक्त केली होती. लोहा कंधार मतदार संघ नांदेड या ठिकाणी त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून नांदेड येथे निवडणूक लढवली होती. त्या ठिकाणी त्यांचं पराभव झाला. 20-01-2025 सोमवारी त्यांनी (शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्र राज्य संघटक) पदाचा राजीनामा दिला असून. ती पुन्हा भारतीय जनता पक्ष प्रवेश करणार आहेत.
आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम करणारा असून. आमदार महेश लांडगे यांनी त्यांना पुन्हा पक्षात घ्यावे. ऊणे दुणे विसरून एकनाथ पवार यांना भारतीय जनता पार्टीचे काम करण्यासाठी पाठबळ द्यावे. एकनाथ पवार यांना पिंपरी चिंचवड शहरात मानणारा वर्ग आहे. आणि कामगार क्षेत्रात एकनाथ पवार यांचे खूप मोठे संघटक असून. एकनाथ पवार यांचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल.
ज्या वेळी शुन्य परिस्थिती मध्ये होती त्या वेळी एकनाथ पवार ह्यांनी भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम करुन सन२०१७ रोजी कै आमदार लक्ष्मण भाऊ जगताप ह्यांच्या सोबत प्रचंड बहुमताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षांची एकहाती सत्ता आणली त्या नंतर भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते पदावर एकनाथ पवार ह्यांनी खूप चांगल्याप्रकारे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या ठिकाणी केले तदनंतर मुळ गावी एकनाथ पवार ह्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि पराभूत झाले आता ते पुन्हा भारतीय जनता पक्षात काम करणार असून त्यांना आमदार महेश लांडगे साहेब ह्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊन पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे हि विनंती करत असून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब रावसाहेब दानवे पाटील पंकजा ताई मुंडे सुधीर मुनगंटीवार ह्यांना लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून एकनाथ पवार ह्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना ह्या ठिकाणी समाविष्ट करून निवडणूक लढवावी हि प्रामाणिक अपेक्षा सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर

