पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात दालनासमोर ‘चिल्लर फेक’ आंदोलन
पिंपरी चिंचवड,दि.14 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागातील मुख्य अधिकारी व ब प्रभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी, बेजबाबदार व जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी तीव्र स्वरूपाचे ‘चिल्लर फेक आंदोलन’ करण्यात येणार आहे. हे आंदोलन पँथर दत्ताभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
अतिक्रमण कारवाई करताना नियम, कायदे, न्यायालयीन आदेश तसेच मानवी संवेदना पायदळी तुडवून सामान्य नागरिक, फेरीवाले, छोटे व्यावसायिक व कष्टकरी वर्गावर अन्याय होत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
महापालिकेचे धोरण व वरिष्ठ प्रशासनाच्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक व वैयक्तिक हितसंबंधांसाठी निवडक कारवाया केल्या जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे.
अतिक्रमण विभागाकडून सामान्य नागरिकांना कोणतीही मदत मिळत नसून, आर्थिक देवाण-घेवाण करून धनदांडग्यांना व ठरावीक व्यावसायिकांना संरक्षण दिले जात असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले. हे सर्व पुरावे पत्रकारांसमोर जाहीर करण्यात येणार असून, अतिक्रमण विभागातील मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचे आवाहन आंदोलकांनी माध्यमांना केले आहे.
वारंवार तक्रारी करूनही संबंधित मुख्य अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप असून, उलट तक्रारदारांना धमकावणे, खोट्या गुन्ह्यांत अडकवणे व अन्यायकारक कारवाया केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
या भ्रष्ट व अन्यायकारक कारभाराच्या निषेधार्थ ‘चिल्लर फेक आंदोलन’ करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :
1. अतिक्रमण विभागाच्या ब प्रभाग अधिकाऱ्यांच्या कारभाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी व चुकीच्या कारवाईत जप्त केलेल्या गाड्या त्वरित सोडाव्यात.
2. मुकाई चौक, किवळे येथील रामदयाल गुप्ता यांच्या अनधिकृत कंटेनर व्यवसायावर त्वरित कारवाई करण्यात यावी.
3. नियमबाह्य व बेकायदेशीर कारवाया तात्काळ थांबवाव्यात. तसेच अनधिकृत पत्रा शेड, अनधिकृत बांधकाम व अनधिकृत व्यवसाय — ज्यांच्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप आहे — अशांवर तात्का
ळ कठोर कारवाई करावी.

