पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये मोठा विस्फोट! उमेदवारी अर्जांवरून कार्यकर्त्यांमध्ये संताप — भाजप नेते सचिन काळभोर पुढाकाराने तक्रार!

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमध्ये मोठी खळबळ!

उमेदवारी अर्जांवरून कार्यकर्त्यांमध्ये जबर नाराजी उसळली!

पिंपरी चिंचवड,दि.08 : पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात तब्बल ७०० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या प्रचंड संख्येमुळे जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे पक्षासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून "आया राम गया राम" प्रकारातील नव्या चेहऱ्यांना तिकीट दिले जात असल्याचा तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे.


शहरातील ६५० ते ७०० कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर, शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोरवाडी पक्ष कार्यालयात उमेदवारीवरून मोठा तणाव निर्माण झाला असून, योग्य निर्णय न घेतल्यास कार्यकर्ते आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.


कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की:

▪️ “गेल्या अनेक वर्षांपासून संघटना वाढवण्यासाठी आम्ही मेहनत केली, शहरातील समस्या सोडवण्यासाठी काम केले, पण निवडणूक आली की बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले जाते.”

▪️ “जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान थांबवून त्यांना न्याय द्यावा, अन्यथा पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करू.”


या वातावरणामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये मोठे वादळ उठले असून

पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.