पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सचिन काळभोर यांचा पुढाकार – नगरसेवकांचे मानधन द्यावे अशी भूमिका

0 झुंजार झेप न्युज

• पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी; शहरातील आमदारांकडून आवाहन अपेक्षित*


पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगर पालिका येथील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आपले एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शहरातील पक्ष कार्यकर्त्यांकडून पुढे आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. “निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर खर्च करून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी समाजातील संकटसमयी पुढे येणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक वर्षाचे मानधन जमा केल्यास पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळेल,” असे भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातून ८५ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत. महापालिका प्रशासनाकडून जाहीर होणारे मानधन स्वेच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्यास पूरग्रस्त शेतकरी बांधवांना थेट आर्थिक मदत मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मानधनाचा त्याग करून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि एक नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा मांडण्यात आली आहे.

शहरातील आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, तसेच अमित गोरखे यांनी यासाठी पुढाकार घेऊन नगरसेवकांना मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आमदारांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतल्यास शहरातून राज्यभर सकारात्मक संदेश जाईल, असे मत व्यक्त होत आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने पुढाकार घेतल्यास सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल आणि जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.