पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त महापौर मा. श्री. रवीजी लांडगे यांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा!

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त महापौर मा. श्री. रवीजी लांडगे यांचा सत्कार व शुभेच्छा सोहळा! 

पिंपरी चिंचवड,दि. 11 : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर पदी नियुक्ती झाल्याबद्दल मा. श्री. रवीजी लांडगे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेली 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा' भेट देऊन त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी वाटचाल सुरू होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर: 

श्री. अरुण श्रीपती पवार (वनश्री वृक्षमित्र, महाराष्ट्र शासन)

श्री. शंकरभाऊ तांबे (उद्योजक, मोहटादेवी ट्रान्सपोर्ट)

कॅप्टन युवराजजी माने

श्री. प्रकाशभाऊ इंगोले (उद्योजक)

श्री. किशोर अटर्गेकर (उद्योजक व एलआयसी प्रतिनिधी).

"नूतन महापौरांच्या कारकिर्दीत शहराची प्रगती उत्तरोत्तर होत राहो, हीच सदिच्छा!"

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.