'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'

0 झुंजार झेप न्युज

नागपूर | सत्ता गेली तरी चालेल पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध कायम आहे, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका संजय राऊतांना लखलाभ, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना नेतेे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना समज द्यावी, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
भविष्यात संजय राऊतांनी बोलताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विचारधारेच्याबाबतीत काँग्रेसची फरफट होऊ देणार नाही. आम्हाला सत्ता नाही विचारधारा महत्वाची आहे, असंही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.