रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा
निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्येसं तापाची लाट
लासलगावात कांद्याचे दर 3 हजार रुपयांवर जाताच अचानक झालेल्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नऊ वाजता कांद्याचा लिलाव सुरु होणार असल्याने बाजार भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुंबई,चेन्नई पोर्टवर तसेच बांग्लादेश बॉर्डरवर व्यापाऱ्यांचा वीस हजार मेट्रिक टन कांदा कंटेनर आणि रेल्वे मालगाडीत पडून आहे.
कांदगा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याने भरलेले 400 कंटेनर मुबंई पोर्टवर उभे आहेत. कुठलीही माहिती न देता मुबई पोर्टवर कांदा निर्यात थांबवण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात 500 ते 600 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर कांदा निर्यात पूर्ववत न केल्यास रस्ता रोको, रेल रोको आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे.
कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. 48 तासात निर्यात बंदी मागे घ्या, अन्यथा नाशिक जिल्ह्यातील टोल बंद करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे व्यापार बंद ठेवण्याचं शेतकरी संघटनांचं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत.
लासलगाव बाजार समिती कांद्याचे सोमवारचे
- जास्तीतजास्त – 3,209 रुपये
- सरासरी – 2,801 रुपये
- कमीतकमी – 1,100 रुपये

