#breaking news. Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत 10 दिवसांसाठी क्वारंटाईन

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत 10 दिवसांसाठी क्वारंटाईन


अभिनेत्री कंगना रनौतला मुंबईहून मनालीला गेल्यानंतर 10 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


 मुंबई: अभिनेत्री कंगना रानौत आपल्या वादग्रस्त वक्त्व्यांनंतर 5 दिवस मुंबईत राहिली. त्यानंतर मुंबईतून हिमाचल प्रदेशमधील मनालीला आपल्या घरी गेली आहे. मात्र, तेथे गेल्यानंतर तिला 10 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कंटेनमेंट झोन असलेल्या मंबईतून आल्याने हिमाचल प्रदेश आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कंगनाला क्वारंटाईन केलं आहे. त्यामुळे आता कंगनाला पुढील 10 दिवस कोठेही बाहेर जाता येणार नाही. तसेच कुणाला भेटताही येणार नाही.

क्वारंटाईन काळातच कंगना रनौतची आठवडाभरानंतर पुन्हा एकदा कोव्हिड 19 चाचणी घेतली जाणार आहे. त्या चाचणीच्या अहवालावरच कंगनावरील निर्बंध शिथिल होणार की आणखी वाढणार हे ठरणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अद्यापही राज्य प्रवेश करण्यासाठी ई-पास सक्ती कायम आहे. महाराष्ट्रात अनलॉक दरम्यान टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होत आहेत.

दरम्यान, मुंबईहून मनालीला जाताना कंगनाने एक ट्वीट करत आपण जड अंतःकरणाने जात असल्याचं म्हटलं. ती म्हणाली, “मी खूप जड अंतकरणाने मुंबई सोडत आहे. या काही दिवसांमध्ये मला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. माझं ऑफिस तोडल्यानंतर माझं घर तोडण्याचा प्रयत्न होत आहे. सशस्त्र सुरक्षा माझ्याभोवती होती, त्यामुळे मी पीओके असं म्हणणं खरंच ठरलं आहे”, असं ट्वीट कंगनाने केलं.

कंगनाचे मुंबईत पाच दिवस कसे गेले? 

9 सप्टेंबर –

  • कंगना मनालीहून मुंबईत आली
  • कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयातील अनधिकृत बांधकाम महापालिकेने तोडले
  • कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख
  • अनेक ठिकाणी कंगनाविरोधात आंदोलनं

10 सप्टेंबर –

  • बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’, कंगनाची मुख्यमंत्र्यांवर कडवट टीका
  • बीएमसीने तोडलेल्या पाली हिलमधील कार्यालयात जाऊन कंगनाकडून पाहणी
  • कंगना रनौत आणि रामदास आठवले यांची भेट
  • रामदास आठवलेंचा कंगनाला पाठिंबा
  • कंगना राणावत विरोधात शिवसेना आक्रमक

11 सप्टेंबर –

  • कंगना रनौतवर ड्रग्ज घेतल्याचा अभिनेता शेखर सुमनचा आरोप, गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

12 सप्टेंबर –

  • कंगनाविरोधात अकोला, औरंगाबादसह अनेक ठिकाणी पोलिसांत तक्रारी

13 सप्टेंबर – 

  • करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेदी कंगना रनौतच्या भेटीसाठी तिच्या घरी गेले
  • कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे गेली, कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेट
  • कंगनाच्या खारमधील घरालाही बेकायदेशी बांधकामाप्रकरणी बीएमसीची नोटीस
  • कार्यालयानंतर आता घरावरही कारवाई होण्याची शक्यता
#breking news#mumbai #@zunjarzep
Follow us in

Fecebook-@zunjarzep

Twittr-@झुंजार झेप 

Insatgram -@zunjarzep

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.