आठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून महिन्यात झेंडूची लागवड, 62 लाखांचा नफा

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप

मो. 9146400308

आठ एकर शेतीत कलिंगड, खरबुजाची लागवड, लॉकडाऊनमुळे लाखोंचा तोटा, जून महिन्यात झेंडूची लागवड, 62 लाखांचा नफा



पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या एका शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या एका शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात कलिंगड आणि खरबुजाची लागवड केली होती (Farmers big profit during lockdown). पण लॉकडाऊनमुळे शेतमाल सडून गेला. यामुळे लाखोंचा फटका शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ भोर यांना बसला. पण यानंतरही भोर यांनी मोठा धोका पत्कारत झेंडुच्या फुलांची लागवड केली आणि या झेंडुच्या फुलांमुळे भोर यांना तब्बल 62 लाखांचा नफा झालेला आहे.

भोर यांना झेंडुच्या फुलांमधून लाखोंचा फायदा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात त्यांची चर्चा सुरु आहे. कोरोना काळात लाखोंचा फटका सहन केल्यानंतर भोर यांनी झेंडुची लागवड केली. लॉकडाऊन काळात मंदिरे बंद होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी झेंडू उपटून फेकले. पण यादरम्यान मात्र भोर यांनी नशीब साथ देईल या आशेवर त्यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.

झेंडुची लागवड करताच त्यांनी नशिबानेही साथ दिली. भोर यांच्या झेंडूला किलोला 100 रुपयांपासून 180 रूपयांपर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आणि भोर यांना आठ एकर झेंडूतून तब्बल 70 लाख रुपये मिळाले. खर्च वजा करता भोर यांना झेंडूतून 62 लाख रुपयांचा नफा झाला आहे.

लॉकडाऊनमुळे भोर यांना झेंडू तोडणीसाठी मजुरांची मोठी टंचाई जाणवत होती अशा काळात भोर यांच्या कुटुंबातील मुलांनी त्यांना मोठी मदत केली. कॉलेज बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी बाहेर असलेले मुले-मुली घरी आले होते. त्यांनी आई-वडीलांना शेतातील कामात मदत केली. सर्वांनी एकीने शेतात मेहनत करतं काबाडकष्ट केले आणि नशिबाने साथ दिली. कष्टाचे चिज झाले आणि झेंडूने भोर कुटूंबीयांना लखपती बनवले.

नेहमीच संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाने संकटावर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतात काबाडकष्ट केले आणि शेतीतून चांगला नफा मिळवला.

Follow us in 

Fecebook-@zunjarzep 

Twittr-@झुंजार झेप 

Instagram-@zunjarzep 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.