रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, थर्मल स्कॅनिंग, मास्कशिवाय प्रवास
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसत नाही.
नाशिक : एकीकडे ट्रेन्स सुरू करताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र शासनाने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. तर दुसरीकडे या नियमांची रेल्वे प्रशासनातर्फे सर्रास पायमल्ली केली जात आहे. शनिवारी 12 सप्टेंबरपासून मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसत नाही.
रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रत्येक सीटसाठी बुकिंग केले आहे. त्यामुळे एकमेकाला खेटून बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेक प्रवासी मास्क न घालताच प्रवास करीत आहे.
तसेच रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचं थर्मल स्कॅनिंगदेखील केली जात नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्याकरिता आम्ही प्रवाशांची पुरेपूर काळजी घेत असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा फोल ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहेत. त्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
पंचवटी एक्स्प्रेस मध्ये सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडत आहे. तसेच इतर रेल्वे गाड्यांची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नसावी, असे बोललं जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
Follow us in-
Instagram-@zunjarzep
Twittr-@झुंजार झेप
Fecebook-@zunjarzep




