रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुलगी बेपत्ता, तब्बल नऊ महिन्यानंतर खुनाचा उलगडा, नातेवाईकांना अटक
उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी जाधव बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
वाशिम : वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या वैष्णवी जाधव बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तिच्या नातेवाईंकाना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यावेळी आरोपीने निर्जनस्थळी तिचा मृतदेह जाळला. त्याशिवाय दुसऱ्या दिवशी न जळालेले उर्वरित अवयव पुरल्याची धक्कादायक माहिती दिली. यावरुन पोलिसांनी पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे.
वैष्णवी जाधव ही मुलगी लाखाळा परिसरातील उच्चभ्रू वस्तीत वास्तव्यास होती. इयत्ता नववी वर्गात शिकणारी ही मुलगी 20 जानेवारी 2020 रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिचा कसोशीने तपास केला. मात्र कुठलाही सुगावा हाती लागत नव्हता. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन वेगवेगळी पथके सुद्धा तयार करण्यात आली होती. मात्र तरीही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नव्हते.
यावेळीआक्रमक होत काही संघटनांनी पोलिसांविरोधात मोर्चा सुद्धा काढला होता. मात्र आता तब्बल नऊ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. वैष्णवीची हत्त्या केल्याच्या आरोपावरुन नातेवाईकांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नात्यात दुरावा निर्माण होऊन वेळोवेळी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बद्री गोटे, माधुरी गोटे या पती-पत्नीला आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पुढील तपास करण्यात येत आहे.
Follow us in-
Fecebook-@zunjarzep
instagram -@zunjarzep
Twittr-@झुंजार झेप

