#breking news # पुणे #लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या : अजित पवार

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308


लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या : अजित पवार

पुणे जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली. यात लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.




पुणे : (झुंजार झेप )जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात पुन्हा जमावबंदी आदेश लागू करण्यासंबदर्भात चर्चा सुरु आहेत. यावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हिसीद्वारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातचं रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन द्या : पालकमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शहरी भागासह ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. 'कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल. रुग्णांना वेळेत ऑक्सिजनयुक्त खाटा व योग्य उपचार मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने काम करावे. ग्रामीण भागातील रुग्णांना त्याच भागात उपचार मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन द्यावीत. येथील ऑक्सिजनयुक्त बेड व अन्य सोयी सुविधांसाठीची अपुरी कामे आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने गतीने पूर्ण करुन घ्यावीत, अशी सूचना करुन नवीन बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयांसाठी विशेष बाब म्हणून तात्काळ पदनिर्मिती करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात गृह सर्वेक्षणावर भर देवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबवावी. यात लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्था व नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.


राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व साधन सामग्री उपलब्ध असल्याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी. या भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना गृह विलगीकरण करण्यात येणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. गृहविलगिकरण केलेल्या रुग्णांना दुरध्वनीव्दारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांची माहिती अद्यावत ठेवावी. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील व खाजगी प्रयोगशाळांमध्ये आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची माहिती अद्ययावत ठेवावी. जेणेकरुन संसर्ग रोखणे सोपे होईल.


महत्वाच्या बातम्या : 
 अजित पवारांकडून  सकाळी सहावाजताच 
 पुणे मेट्रोच्या  कामाची पाहणी

 आयुक्त कृष्णप्रकाश  त्यांच्यासोबत  विना मास्क  फोटो काढणाऱ्या राष्ट्रवादी  नेत्यांवर कारवाई होणार का?

 जम्बो  कोविड हॉस्पिटलमध्ये बेडस्  उपलब्ध, तरीही  रुग्णांना थेट एन्ट्री  नाही आधी 'हे' करा...!

Ajit Pawar Reviews Pune Metro Work | अजित पवारांकडून सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

Follow us in 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.