#crime # शिर्डी #लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने मुलीच्या घरासमोरच स्वतःला पेटवले, मुलाचा मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने मुलीच्या घरासमोरच स्वतःला पेटवले, मुलाचा मृत्यू

मुलीने लग्नास दिल्याने प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना शिर्डीमध्ये घडली आहे. मुलाने मुलीच्या घरासमोरच स्वत:ला पेटवून घेतलं. यातएहग मुलीचे वडील आणि तरुणीही जखमी झाली आहे.


शिर्डी : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह स्वतःला गोळी झाडल्याची घटना ताजी असतानाच शिर्डीमध्ये मुलीने लग्नास नकार दिल्याने तरूणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तरूणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विक्रम मुसमाडे या तरूणाने एकतर्फी प्रेमातून तरूणीवर गोळीबार करत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सदर तरूणी सुदैवाने वाचली आहे मात्र  दुसरी घटना शिर्डीमध्ये घडली असून काल गुरूवारी दुपारी सार्थक बनसोडे या तरूणाने मुलीने लग्नास नकार दिल्याने तिच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतलं आहे. या घटनेत सदर मुलीचे वडील आणि तरुणीही जखमी झाली आहे. मागील 5 वर्षांपासून दोघं एकत्र असल्याचं मुलाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.


90 टक्के भाजलेल्या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केला. शिर्डीच्या घटनेत संबधित तरुणाच्या फेसबुकवर अकांऊटवरून सुसाईड नोट आणि काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. याचा देखील सायबर सेल तपास करत आहेत.

Follow us in-


Instagram -

Twittr-

Fecebook -



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.