#Health Tips : हळदीच्या दुधाचे 'हे' आहे आरोग्यदायी फायदे

0 झुंजार झेप न्युज

  रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

Health Tips : हळदीच्या दुधाचे 'हे' आहे आरोग्यदायी फायदे

हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच इतर देखील फायदे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.


  हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.


  1. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते.

  1. जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली तर त्याठिकाणी हळद हे अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. हळद बॅकटेरिया मारण्यासाठी मदत करतं. त्यामुळे जखम झाल्यास हळद लावली जाते.

  1. हळद दूध रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते. विविध अभ्यासानुसार असे सांगितले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो.

  1. हळद दुधामुळे पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील आंबटपणा कमी होतो. हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.

  1. हळद दुधात एक चिमूटभर मिरपूड ठेवल्यास घसा खवखवणे आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते.

  1. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.

  1. झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते.

Follow us in-


Instagram -

Twittr-

Fecebook -

   जाहिरात व बातम्‍यासाठी संपर्क-
रमेश ब्रम्हा  संपादक झुंजार झेप 
मो. 9146400308

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.