सुप्रीम कोर्टाचे रसन्यायाधीश रंजन गोगोई यांना आता सेवानिवृत्तीनंतर झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांचा कार्यकाळ येत्या 17 नोव्हेंबरला संपत आहे. गेल्या आठवड्यात अयोध्या राम जन्मभूमी वादाबाबत त्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तर सेवानिवृत्तीनंतर रंजन गोगोई यांना आसाम पोलिसांना डिब्रुगढ स्थित पैतृक आवास आणि गुवाहाटी मधील दुसऱ्या घराच्या सुरक्षिततेसाठी आदेश देण्यात आले आहेत.
आसाम मधील पोलिसांनी याबाबत माहिती देत सांगितले की, त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून रंजन गोगई यांच्या सुरक्षिततेत वाढ करावी. त्यानुसार गोगई यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.
त्यामुळे गोगई यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक सोय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. रंजन गोगई सेवानिवृत्तीनंतर गुवाहाटी येथे राहण्यास जाणार आहेत.
गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, मंत्रालयाच्या कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत व्यक्तीगत टिप्पणी करणार नाही. तर रंजन गोगई यांच्यासह त्यांच्या खंडपीठातील अन्य चार न्यायाधीशांच्या सुरक्षिततेत सुद्दा वाढ करण्यात येणार आहे. गोगई यांना सर्वोच्च श्रेणीतील सुरक्षा दिली असून अन्य न्यायमुर्तींना सुद्धा विविध श्रेणीनुसार सुरक्षा पुरवली जाणार आहे.