नवमहाराष्ट्र कामगार आघाडी च्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर. रवि लांडगे नवमहाराष्ट्र कामगार आघाडी च्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर. रवि लांडगे यांच्याकडे उद्यानांतील ठेकेदारी बंद करण्याची मागणी.

0 झुंजार झेप न्युज

नवमहाराष्ट्र कामगार आघाडी च्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर. रवि लांडगे यांच्याकडे उद्यानांतील ठेकेदारी बंद करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड,दि.09 : शहरातील उद्यानांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत, सध्याची ठेकेदारी पद्धत तात्काळ बंद करून महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि रोजगार संस्थांना काम देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका महापूर रवि लांडगे यांच्याकडे करण्यात आली आहे.

संबंधित निवेदनात म्हटले आहे की, अनेकमहापूरने ही अक्षरशः “भ्रष्टाचाराची कुरणे” बनत चालली असून, काही ठेके हे संबंधित नगरसेवक, अधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेच्या कररूपी पैशाची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

उद्यानांच्या देखभालीत अनेक त्रुटी असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. झाडांना नियमित पाणी न देणे, गवत व झाडांची वेळेवर कटिंग न करणे, पालापाचोळा साफ न करणे, कुंड्यांची योग्य देखभाल न ठेवणे तसेच उद्यान परिसरात अस्वच्छता वाढल्यामुळे अनेक उद्याने दिवसेंदिवस ओसाड होत चालल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे सध्याचे ठेकेदार तात्काळ बदलून त्यांच्या जागी महिला बचत गट, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आणि शासनमान्य संस्थांना प्राधान्याने ठेके देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे गोरगरीब महिलांना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होईल आणि ठेकेदारीतील मक्तेदारी संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन नव्या पिढीला रोजगार आणि संधी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी नव महाराष्ट्र कामगार आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे, सुदर्शना म्हस्के (पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी), धर्मी सोनार, भाग्यश्री कसबे, पूजा सोनवणे आदी उपस्थित होते. त्यांनीही उद्यानांतील कथित भ्रष्टाचाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत महिला बचत गटांना प्राधान्य देण्याची मागणी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.