सचिन काळभोर यांचा इशारा : “राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही!” 🇮🇳

0 झुंजार झेप न्युज

 भक्ती शक्ती उद्यानातील तिरंग्याच्या दुर्लक्षावरून संताप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार

पिंपरी चिंचवड, दि.08: पिंपरी-चिंचवड शहरातील भक्ती शक्ती उद्यान येथे सन २०१८ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंगा उभारण्यात आला होता. देशाच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या या तिरंग्याचे दररोज सकाळी ध्वजारोहण करण्यात येते. मात्र सध्या त्या ठिकाणी फडकविण्यात येणारा तिरंगा फाटलेल्या अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, तिरंग्याच्या देखभालीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून विद्युत विभागामार्फत संबंधित ठेकेदाराला तब्बल ४६ लाख रुपये वार्षिक रक्कम दिली जाते. असे असतानाही राष्ट्रध्वजाच्या सन्मानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार पाठविण्यात आल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली.

राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांमधूनही होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.