कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द

0 झुंजार झेप न्युज

कोरोनामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द

कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही(Parliament Winter Session Cancelled)असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनामुळं यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. जोशी यांनी सांगितलं की, कोविड 19चा प्रसार टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हे अधिवेशन न घेण्याबाबत मत मांडलं होतं. आता जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

जोशी यांनी सांगितलं की, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घ्यावं अशा मागणीचं पत्र दिलं होतं. मात्र कोरोनामुळं अधिवेशन होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.

दिल्लीमध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. देशात देखील कोरोनाचा प्रकोप पुन्हा हळूहळू वाढत असल्याचं दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.