चिखलीत घरातून मित्राचे अपहरण करून त्याचा दहा जणांच्या टोळक्याकडून निर्घृण खून…
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- चिखली परिसरात घरातून मित्राचे अपहरण करून दहा जणांच्या टोळक्याने त्यांचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतलं असून, यातील मुख्य आरोपी हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. आर्थिक व्यवहारात फेरफार केल्याचा कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
सचिन चौधरी (वय- २२ रा. रुपीनगर तळवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मृत्यू झालेला तरुण आणि आरोपी हे मित्र असून सराईत गुन्हेगार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी सचिनचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आज(रविवार) शिरगाव पोलीस चौकीच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सनी उर्फ नकुल कुचेकर (वय-२५ रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि गौरव रमेश डांगले (वय-२२ रा. चिंचवडगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
