ई-पीक, तलाठी दप्तर व बचत गटाच्या कामांची केली पाहणी
यवतमाळ,दि.10: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज देवनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देवून तेथील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांना व्यवस्थीत लिहता वाचता येते काय, त्यांचेसाठी खेळणे, पिण्याचे पाणी, वर्ग खोल्या तसेच पटसंख्येनुसार शिक्षक आहेत का याबाबत त्यांनी तपासणी केली. जिल्हाधिकारी यांनी यावेळी बचत गटाच्या वनउपज विक्री केंद्र, धान्य स्वच्छता व प्रतवारी मशीन तसेच पाणी फिल्टर मशीनची देखील पाहणी केली. महिलांनी वेगवेगळ्या कामातून आपले उत्पन्न वाढवून व आर्थिकरित्या सक्षम व्हावे याबाबत त्यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.
जोडमोहा, वाढोणा खुर्द व कळंब येथे जिल्हाधिकारी येडगे यांनी तलाठी दप्तर व रेशन दुकाणाची तपासणी केली तसेच लसिकरण सत्राला भेट दिली. तर वाढोणा खुर्द येथे त्यांनी स्वत: ई-पीक पाहणीच्या नोंदी घेतल्या. तलाठी दप्तर व लिपीक दप्तराची तपासणी करतांना कामकाजातील चुका निदर्शनात आणून त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधीतांना दिल्या.
याप्रसंगी राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, कळंबचे तहसीलदार सुनिल चव्हाण, अधिक्षक अमोल पवार, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, तालुका आरोग्य अधिकारी विजय अकोलकर, मुख्याधिकारी नंदु परळकर, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंच, शिक्षक, महिला बचत गटाच्या सदस्या तसेच संबंधीत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
