सूर्या लॉन्सवरील हळदीच्या कार्यक्रमात चोरलेले 42 तोळे दागिने मिळाले,औरंगाबाद पोलिसांची कारवाई
औरंगाबादः शहरातील सूर्या लॉन्सवरील एका हळदीच्या कार्यक्रमात झालेली हायप्रोफाइल चोरी (Aurangabad theft) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाळेने यशस्वी कारवाई केली आहे. येथील परराज्यातील टोळीने 6 डिसेंबर 2021 रोजी ही हायप्रोफाइल चोरी केली होती. औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे (Crime branch Aurangabad) शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला गजाआड केले. त्याच्याकडून 42.5 तोळे दागिने जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी फिर्यादी सुनील जैस्वाल (Sunil Jaiswal) यांना हे दागिने परत केले. पोलिसांनी परत केलेल्या दागिन्यांची किंमत 24 लाख 77 हजार 850 रुपये एवढी आहे. तसेच पोलिसांनी या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीचे नाव अभिषेक विनोद भालुनिया असे आहे. या चोरीनंतर औरंगाबामध्ये मोठी खळबळ माजली होती.
6 डिसेंबर रोजी झाली होती चोरी
सूर्या लॉन्समध्ये 6 डिसेंबर 2021 रोजी ही चोरी झाली होती. व्यापारी असलेले जैस्वाल यांच्या मुलाचा विवाह सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ते नागपूरहून औरंगाबादेत आले होते. 6 डिसेंबरला रात्री हळदी समारंभ असल्याने सर्व दागिने वधूच्या अंगावर घालून पुन्हा काढून ठेवले होते. त्याचवेळी समारंभात घुसलेल्या आरोपींनी आणि त्याच्या साथीदारांनी 56 तोळे दागिने अससलेली बॅग लंपास केली होती.
