खेड तालुक्यातील त्या ड्रग्ज कारवाईचे आंतरराज्यीय कनेक्शन…

0 झुंजार झेप न्युज

 खेड तालुक्यातील त्या ड्रग्ज कारवाईचे आंतरराज्यीय कनेक्शन…

पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली होती. याप्रकरणात तपासाच्या तिसऱ्या टप्प्यात आंतरराज्यीय कनेक्शन उघड झाले असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुजरात आणि मुंबई येथून सहा जणांना अटक केली आहे.

परशुराम भालचंद्र जोगल (वय ४४, रा. ठाणे, मूळगाव जोगलवाडी, मिडबाव, देवगड, जि. सिंधूदुर्ग), मंदार बळीराम भोसले (वय ४९, रा. ठाणे), राम मनोहरलाल गुरबानी (वय ४३, रा. वेस्ट मुंबई), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (वय ३९, रा. ओशिवरा मुंबई, मुळगाव जि. मुझफरनगर, उत्तरप्रदेश), मनोज एकनाथ पालांडे (वय ४०, रा. वरसे, ता. रोहा, जि. रायगड), अफजल हुसैन अब्बास सुणसरा (वय ५२, रा. जोगेश्वरी, वेस्ट मुंबई, मुळगाव मेहता. ता. बडगाम जि बनासकाठा, उत्तर गुजरात) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी यापूर्वी चेतन फक्कड दंडवते (वय २८, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय २५, रुईखेडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव. सध्या रा. अकोले, ता. शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय २५, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय ४४, रा. झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय ३१, रा. मुजफ्फरनगर, सध्या रा. नोएडा), तुषार सूर्यकांत काळे (रा. बोरीवली) आणि राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी (रा. वसई) आणि नायजेरियन व्यक्ती झुबी इफनेयी उडोको या तिघांना अटक केली आहे.

आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे १५ किलो एमडी ड्रग्ज तयार केल्याचे सामोर आले आहे. आरोपी अरविंदकुमार याने एमडी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ३५ लाख रुपये घेतले. मुख्य सुत्रधार तुषार काळे व राकेश खनिवडेकर यांच्याकडून अनुक्रमे ६० लाख व २५ लाख रुपये, असे ८५ लाख रुपये जप्त करून ७५ लाखांच्या जमीन खरेदीबाबतचे दस्तऐवज पोलिसांनी जप्त केले आहेत. आतापर्यंत २० आरोपी अटकेत असून आणखी आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.