उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात

0 झुंजार झेप न्युज

भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

धुळे: अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला. 

ते रविवारी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. भाजपने दगा केला नसता तर आज राज्यात युतीची सत्ता असती. भाजप हा गरीबांचा नव्हे तर उद्योगपतींचा पक्ष आहे. राम मंदिराच्या नावाने निधी संकलन करणाऱ्या भाजपने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानायला हवेत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

सत्ता पडण्याची वाट पाहणारे हँग झाले’

महाविकासाघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, अशी शाब्दिक कोटीही त्यांनी केली. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवणारच

आगामी निवडणुकीत धुळे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. धुळे महानगरपालिकेत शिवसेनेचे 55 नगरसेवक निवडून येतील. शिवसैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिव दरबार भरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे’

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान मंदिरे सुरु करण्यासंदर्भात मागणी होत होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशाप्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळल्याचे सांगत शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.