भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले..
पिंपरी चिंचवड:आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, विलास मडिगेरी, शैलेंद्र मोरे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्या सारिका सस्ते, मिनल यादव, सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त सुभाष इंगळे, अजय चारठणकर, आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मंगेश चितळे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
झुंजार झेप न्यूज च्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


