उस्मानाबादेत कोरोनाचा कहर, कळंबमध्ये सराफा दुकानातील 42 जण पॉझिटिव्ह!

0 झुंजार झेप न्युज

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये सराफा लाईनमध्ये एकाच दिवसात 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 10 जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कळंबमध्ये एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या संख्येतही आता वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता कपडा, सोने आणि आडतीची मोठी बाजारपेठ असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये सराफा लाईनमध्ये एकाच दिवसात 42 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य 10 जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कळंबमध्ये एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

प्रशासनाने व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सराफा लाईनमधील व्यापारी आणि कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, कळंब शहरातील सर्व व्यापारी आणि कामगारांची कोरोनाचा चाचणी पुढील 8 दिवसांत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

व्यापारी, कामगारांची कोरोना चाचणी

19 मार्च – औषधी दुकाने

20 मार्च – किराणा दुकाने

22 मार्च – बेकरी, हॉटेल्स, लॉज, बियर बार

23 मार्च – जनरल स्टोअर्स

24 मार्च – भाजी, फळ विक्रेते

25 मार्च – केशकर्तनालय

26 मार्च – कृषी संबंधित दुकाने

27 मार्च – कापड दुकाने

28 मार्च – गॅरेज, ऑटोमोबाईल्स दुकाने

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्थिती

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा विचार केला तर बुधवारी जिल्ह्यात एकूण 94 नवे रुग्ण आढळून आले होते. बुधवारच्या आकडेवारीनुसार उस्मानाबाद जिल्यात सध्या कोरोनाचे 512 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर एकूण 18 हजार 59 रुग्ण उस्माबाद जिल्ह्यात आढळले होते. त्यापैकी 16 हजार 953 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93.88 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 589 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आठवड्याभरातील कोरोनाची वाढ

10 मार्च – 24 रुग्ण

11 मार्च – 58 रुग्ण

12 मार्च – 27 रुग्ण

13 मार्च – 54 रुग्ण

14 मार्च – 69 रुग्ण

15 मार्च – 52 रुग्ण

16 मार्च – 123 रुग्ण

17 मार्च – 94 रुग्ण

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.