देशात सलग दुसऱ्या दिवशी 62 हजारहून अधिक रुग्णांची नोंद, 24 तासात 312 रुग्णांचा मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

गेल्या 24 तासांत 62,714 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 312 जणांनी आपला जीव गमवला आहे. तर 28,739 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महाराष्ट्रासह काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाचं संक्रमण कमी होताना दिसत नाही. सलग दुसर्‍या दिवशी 62 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यावर्षीची ही सर्वाधिक संख्या आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 62,714 हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 312 जणांनी आपला जीव गमवला आहे. तर 28,739 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी शुक्रवारी 62,258 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती

एकूण कोरोनाबाधित रुग्ण - एक कोटी 19 लाख 71 हजार 624

एकूण डिस्चार्ज - एक कोटी 13 लाख 23 हजार 762 रुपये

एकूण सक्रिय रुग्ण - 4 लाख 46 हजार 310

एकूण मृत्यू - एक लाख 61 हजार 552

एकूण लसीकरण - 6 कोटी 2 लाख 69 हजार 782 डोस दिले

सहा कोटींपेक्षा जास्त जणांचं लसीकरण 

कोरोना लस देण्याची मोहीम 16 जानेवारीपासून देशात सुरू झाली. 27 मार्चपर्यंत देशभरात 6 कोटी 2 लाख 69 हजार 782 कोरोना डोस देण्यात आले आहेत. 26 मार्चला 21 लाख 54 हजार 170 जणांना लस देण्यात आली. लसीचा दुसरा डोस देण्याची मोहीम 13 फेब्रुवारीपासून सुरू झाली. देशातील कोरोनाचा मृत्यू दर 1.35 टक्के आहे तर रिकव्हरी दर 95 टक्क्यांच्या आसपास आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 3.80 टक्के आहे. कोरोना अ‍ॅक्टिव्ह प्रकरणात भारताचा जगात 6 वा क्रमांक आहे.

गेल्या 24 तासांत एकाही कोविड-19 मृत्यूची नोंद झाली नाही. यात आसाम, ओदिशा, पुदुचेरी, लडाख (केंप्र), दिव-दमण, आणि दादरा-नगर हवेली, लक्षद्वीप, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, मिझोरम, आंदमान निकोबार बेटे, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.