दहावी बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षा दरवर्षी देतात त्यांना यावर्षी सवलतीचे अतिरिक्त कला गुण मिळणार नसल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती विचारात घेतात शिक्षण विभागाने शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) 2020 न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जे दहावी बोर्डाचे विद्यार्थी या परीक्षा दरवर्षी देतात त्यांना यावर्षी सवलतीचे अतिरिक्त कला गुण मिळणार नसल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे
2021 साठी दृश्यकला पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेमध्येही रेखाकला उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नयेत असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सवलतीच्या कला गुणांवर गदा आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी पालक व्यक्त करत आहेत.
कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (ए टी डी )व मूलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन ) यांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही रेखाकला परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट यावर्षीसाठी शिथिल करावी असे ही या निर्णयात म्हटले आहे.

