जळगावात महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी; भाजपला दगाफटक्याची भीती

0 झुंजार झेप न्युज

शिवसेनेचे माजी महापौर श्री नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते हे नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेनेने  महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. 

या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे कारण जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत हे नेतृत्व करत असल्याची माहिती मिळाली असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पूर्ण ताकद लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत.

आज सकाळी अकरा वाजता शिवसेनेच्या महापौरपदाचे उमेदवार जयश्री महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपचे बंडखोर श्री कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर श्री नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते हे नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जवळपास या दोन्ही उमेदवारांची विजय निश्चित असल्याचे जोरदार चर्चा सर्वत्र आहे.

भाजपला फाटाफूट होण्याची भीती

भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे . भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.