लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

लोटे एमआयडीसीमधील घरडा  इथे एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.

रत्नागिरी : लोटे एमआयडीसीमधील  घरडा केमिकल कंपनीत भीषण  स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळी एकापाठोपाठ एक असे दोन स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले.

जखमी कामगारांना कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीतील बॉयलर गरम होऊन अचानक स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात सहा जण जखमी झाले होते, त्यापैकी काहींचा मृत्यू झाला. तर स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे कंपनीत 40-50 जण अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी सात ते आठ ॲम्बुलन्स दाखल आहेत. अग्निशमन दलाने आगीवर यश मिळवत, जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं.

नेमकं काय घडलं? 

लोटे एमआयडीसीतील घरडा इथल्या केमिकल कंपनीत नेहमीप्रमाणे कामगार दाखल झाले. मात्र आधापासूनच कार्यरत असलेला कंपनीतील बॉयलर प्रचंड गरम झाला होता. या केमिकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. यामध्ये काही कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. तर काही जण जखमी झाले.

जखमी कामगाराला मुंबईला हलवणार

दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. या कामगाराला तातडीने मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. बॉयलरच्या स्फोटामुळे कंपनीत भीषण आग लागली. या आगीने अनेक कामगारांना आपल्या कवेत घेतलं. त्यामुळेच काहींचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.