जळगावात तीन दिवस कडक निर्बंध, काय सुरु, काय बंद?

0 झुंजार झेप न्युज

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

जळगाव : राज्यात ठिकठिकाणी कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जळगावात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस निर्बंध लावण्यात आले आहेत. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश जारी केले आहेत. जळगाव जिल्ह्यात 28 मार्चला होळी आणि 29 मार्चला धुलिवंदन आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मंगळवारी रात्री 12 पर्यंत हे निर्बंध लागून असणार आहे.

या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.

🛑जळगावात काय बंद राहणार?🛑

💠सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील.

💠किराणा दुकाने, इतर सर्व दुकाने बंद राहतील,

💠किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.

💠शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.

💠हॉटेल, रेस्टॉरंट (पार्सल सकाळी 9 ते रात्री 9 वगळता) बंद राहील

💠सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक आणि तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

💠शॉपिंग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, दारुची दुकान बंद राहतील.

💠गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, थिएटर, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.

💠पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.

💠खासगी वाहतूक बंद राहतील. (अत्यावश्यक सेवा वगळता)

💠दुध विक्री केंद्र सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान सुरू राहतील.

💠होळी व धुलीवंदन निमित्ताचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द व मनाई राहणार.

🛑 जळगावात काय सुरु राहणार? 🛑

💠नियोजित वैधानिक सभा ऑनलाईन पध्दतीने घेता येतील.

💠कोवीड लसीकरण केंद्र सुरू राहणार

💠औद्योगिक अस्थापना सुरू राहतील. (ओळखपत्र बाळगणे आवश्यक)

💠वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सूट

जळगावात कोरोना रुग्णांची संख्या 980 वर

दरम्यान जळगाव शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या 980 वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी 1993 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात चोपडा तालुक्यातील तब्बल 362 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जळगाव शहरात 252 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात तब्बल 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.