मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना शिष्टमंडळ, गोरे कुटुंबियासोबत घेतली भेट
मुंबई:शिवसेना शिष्टमंडळ व खेड विधानसभेचे माजी आमदार स्व.सुरेशभाऊ गोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत आज मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेतली.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विकासकामांसाठी भरीव निधीची मागणी केली. खेड पंचायत समितीची मंजूर प्रशासकीय इमारतीची जागा बेकायदेशीर पद्धतीने जिल्हा परिषदेने महसूल विभागाला दिल्याबद्दल मा.मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून आजवरच्या सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती देण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे,खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, खेड पंचायत समिती सभापती भगवानशेठ पोखरकर, उपसभापती ज्योतीताई आरगडे, आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनशेठ गोरे, स्व. मा.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या सुविद्य पत्नी व केशवराव आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

