राज्य सरकारने पत्रकारांनाही कोरोना योद्धा समजून त्यांना लस मोफत द्यावी; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्र्याकडे मागणी.

0 झुंजार झेप न्युज

राज्य सरकारने पत्रकारांनाही कोरोना योद्धा समजून त्यांना लस मोफत द्यावी; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्र्याकडे मागणी.

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – डॉक्टर्स, नर्स, पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यभरातील पत्रकारांनाही कोरोना लस मोफत देण्यात यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राज्यातील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी कोरोना संक्रमणाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे सर्व पत्रकारांना कोरोना लसीचे संरक्षण मिळणे त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर सरकारमार्फत पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलिस यांना लस देण्यात आली. आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या नागरीकांना लस देण्यात येत आहे. मात्र, पत्रकारांना कोरोना लस देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

कोरोना योद्धांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाहीत. पत्रकारही स्वत:चा जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. पत्रकार वृत्तसंकलनासाठी जातात तेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतात. त्याचप्रमाणे त्यांना वृत्तसंकलनासाठी विविध रुग्णालयांमध्ये सुद्धा जावे लागते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा काही पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकारांनाही कोरोना लस मोफत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.