नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

0 झुंजार झेप न्युज

छत्तीसगडच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. 

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. त्यामुळे नक्षलवाद्यांविरोधात आता मोठं अभियान हाती घेतलं जाणार आहे. नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दल आता प्रहार-3 ही मोहीम हाती घेणार असून नक्षलवाद्यांचे टॉप 8 कमांडर रडावर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्सची मदत घेण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच एनटीआरओ सुरक्षा एजन्सीची रिअल टाईम माहिती देऊन मदतही केली जाणार आहे.

हिडमा रडारवर

सुरक्षा यंत्रणा आता मोस्ट वाँटेड नक्षली कमांडरची यादी करून लवकरच त्यांच्या विरोधाती मोहीम हाती घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन प्रहार-3 नुसार नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात येणार आहे. सुरक्षा दलाने काही टॉप नक्षलवाद्यांची यादीही बनवली आहे. इतर नक्षलवाद्यांची यादी तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या यादीत पीएलजीए-1 चा सर्वात मोठा कमांडर हिडमाचाही समावेश आहे. हिडमा हा सुकमाच्या जंगलात लपून सुरक्षा दलाच्या जवानांना टार्गेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या यादीत केवळ हिडमाच नाही, तर इतरही नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

टॉप आठ नक्षलवादी कमांडर

हिडमा

कमलेश ऊर्फ लछू

साकेत

मंगेसजी

रामजी

सुखलाल

मलेश

हे सर्वजण नक्षल्यांच्या विविध गटांचे कमांडर आहेत. हेच लोक सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना आखत असतात. तसेच तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही करत असतात. त्यामुळे या आठही टॉप कमांडरची सुरक्षा दलाने यादी तयार केली असून त्यांच्याविरोधात लवकरच मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

22 जवान शहीद

छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची शुक्रवारी चकमक झाली. यात नऊहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं असली तरी या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. 250 नक्षलवाद्यांशी सामना करताना जवानांनी पाच तास झुंज दिली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.