मुंबई पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता, महिनाभरात तब्बल 45 हजार सक्रीय रुग्ण

0 झुंजार झेप न्युज

त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल 45 हजारांहून अधिक सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईची वाटचाल पुन्हा एकदा हॉटस्पॉटकडे होताना पाहायला मिळत आहे. 

आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये गेल्या महिन्याभरात 45 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येसह सक्रीय रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईतील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 55 हजार 005 वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाविरोधातील लढा आतापर्यंत सुरु आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबर 2020 अखेरीस कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत होते. त्यानंतर मात्र नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे.

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

राज्यात कोरोना रुग्णांचा कहर पाहायला मिळत आहे. काल तब्बल 43 हजार 183 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज 7 ते 8 हजार कोरोनाबाधित आढळत आहे. तसेच मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या 1 मार्च 2021 मध्ये 9 हजार 690 कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. तर काल 1 एप्रिलला महिनाभरात ही संख्या तब्बल 55 हजार 005 वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सक्रीय रुग्णांची सद्यस्थिती

1 मार्च – 9690

15 मार्च – 14582

25 मार्च – 33961

1 एप्रिल – 55005

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांवर आला आहे. 25 मार्च ते 31 मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो 1.38 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.