सोलापुरात अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच रक्त सांडलं, लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला संपवलं!

0 झुंजार झेप न्युज

याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील डोणगावमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यापूर्वीच विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील डोणगाव येथे आरोपी गणेश बंडगर राहतो. त्याचे दोन महिन्यापूर्वीच गणेश आणि अमृताचा विवाह झाला होता. विवाहनंतर काही दिवसांनी गणेश त्याच्या पत्नीवर चारित्र्यावरुन संशय घ्यायचा. दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत चालला होता. यामुळे या दोघांमध्ये दररोज भांडण होतं

रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने वार

कालही अशाचप्रकारे त्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की पती गणेश बंडगरने रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. यामुळे अमृताचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेनंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गणेश बंडगर याच्यावर सलगर वस्ती पोलीस चौकीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.