कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक, सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

0 झुंजार झेप न्युज

कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक, सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

मुंबई : महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन  जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर आजपासून (5 एप्रिल) दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू राहील. या काळात रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन अशी सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे, मात्र त्याविषयी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

– ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी

– टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या 50 टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी

– सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास 500 रुपये दंड

– सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घ्यावे

– 10 एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक

– रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड

– ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही

– लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई

– सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्याची गरज

महाराष्ट्रात खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

– खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी

– येत्या शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही

– केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी

– खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं

– 10 एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक

– ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार

– RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.